'कोरोना व्हायरस'ने मुक्या प्राण्यांवर केली 'करुणा' : डॉ. कल्याण गंगवाल

पुणे : जगभर सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चीनमधून सुरु झालेला हा आजार आता भारतात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात येऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रात अनेक देव-देवतांच्या यात्रा-जत्रा भरवल्या जातात. मात्र, कोरोनाची धास्ती घेत सर्वच ठिकाणी गर्दी न करण्याचे आणि यात्रा मोठ्या प्रमाणात न करण्याचे निर्णय होत आहेत. त्यामुळे या यात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी प्राण्यांची कत्तल वाचणार असून, लाखो प्राण्यांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे या प्राण्यांवर कोरोना व्हायरसने करुणा केली असेच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले

 

कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी भक्तांनी यंदा गडावर येऊ नये, असे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर वडगावमावळ येथे झालेल्या बैठकीत डॉ. कल्याण गंगवाल यांनी प्रबोधन करत जनजागृती केली. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, धर्मादायचे चव्हाण यांच्यासह देवस्थान प्रतिनिधी, ग्रामस्थ, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. गंगवाल यांनी शाकाहाराचे महत्व आणि प्राण्यांचा बळी देऊ नये, असे आवाहन केले. त्यानंतर एकविरा देवस्थांसह अनेक देवस्थानांची केवळ धार्मिक विधी आणि पूजा होईल, इतर गोष्टी होणार नाहीत, असे जाहीर केले. त्यामुळे हजारो मुक्या प्राण्यांचे जीव वाचणार आहेत. या धार्मिक स्थळांवर देवी-देवतांच्या गाभाऱ्यात पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. तेथे गाभाऱ्यात मांस न्यायलाही परवानगी नसते. त्यामुळे लोकांनी प्राण्यांचा बळी देऊ नये, असे आवाहनही त्यांनी के