नवी दिल्ली :-
कोरोना विषाणूच्या साथीविरोधात लढण्यासाठी ठोस रणनीती आखण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांना केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या धोरणांवर चर्चा केली जाऊ शकते, असे त्यांनी सुचवले. अशा प्रकारे एकत्र येऊन सार्क राष्ट्रे जगासमोर उदाहरण ठेवू शकतात आणि निरोगी वसुंधरेसाठी योगदान देऊ शकतात, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
जागतिक लोकसंख्येतली मोठी लोकसंख्या दक्षिण आशियात राहते. आपल्या नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठीच्या प्रयत्नात कोणतीही कसर ठेवता कामा नये, असे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. नोवेल कोरोना विषाणू कोविड-19ला पायबंद घालण्यासाठी विविध स्तरावर सरकार सर्वोत्तम प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगिले.